शिर्डी । प्रतिनिधी:-
भाजपा कामगार आघाडी प्रदेश सदस्यपदी नानासाहेब शिंदे पाटील यांची निवड* भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी शिर्डी येथील नानासाहेब शिंदे पाटील यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष माननीय श्री गणेश ताठे यांनी निवडीची घोषणा मुंबई येथील बैठकीत केली.
प्रदेशाध्यक्ष व भाजपा नेते माननीय संजय केनेकर यांच्या हस्ते नानासाहेब शिंदे यांना निवडीचे पत्र दिली या प्रसंगी कामगार आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिक्रिया देताना नानासाहेब शिंदे म्हणाले की माझे आजोबा श्री माधवराव शिंदे पाटील शिर्डी संघ चालक ते शिर्डी गाव भाजपा चे ते पहिले अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यांनी पक्षासाठी केलेले कार्य व पक्षासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान याची मला जाणीव आहे त्यामुळे पक्षाची शिस्त व संस्कार सांभाळून मी कामगारांच्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करीत राहणार आहे तसेच साईबाबा संस्थान मधील कार्यरत असणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांची सुद्धा प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे.

