जिल्हा परिषद कार्यालयासमोर पाचव्यांदा प्राणांतिक उपोषण 10 जानेवारी 2022 पासून सुरू होणार..!
लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा अन्यथा मंत्रालयासमोर करण्यात येईल आमरण उपोषण..!
अहमदनगर । प्रतिनिधी : जिल्हा परिषद कार्यालयासमोर चार वेळा प्राणांतिक उपोषण करूनही निष्क्रिय प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अशा ढिसाळ कारभाराला जाग आणण्यासाठी पाचव्यांदा प्राणांतिक उपोषण करावे लागते ही शोकांतिकाच नव्हे तर भयावह आहे.
जर शेतच कुंपण खायाला लागले तर बाकीचे अवघड आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे..? असा सवाल करून सामाजिक कार्यकर्ते संजय राजेभोसले व प्रवीण खोमणे यांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबून पुन्हा पाचव्यांदा प्राणांतिक उपोषणास बसणार आहे.
दि.27/12/2021 चौथे पाच दिवस प्राणांतिक उपोषणाच्या वेळी जि.प.अध्यक्षा सौ.राजश्री ताई घुले व आरोग्य अधिकारी सांगळे साहेब यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित केले त्यावेळीचे वरील दोन फोटो...
सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद कार्यालयासमोर दहिगांव -ने तालुका शेवगाव येथील १-१२-२०२१ रोजी झालेल्या एक दिवसाचे प्रांणातिक उपोषण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशी करून कार्यवाही करू असे आश्वासन नंतर या उपोषणाला स्थगिती दिली होती.परंतु कुठलीही कारवाई होत नाही. यानंतर दिनांक 9/12/ 2021 पंचायत समिती, शेवगाव समोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. तेव्हा ही नुसते आश्वासन दिले. त्यानंतर 22/ 12 /2021 जिल्हा परिषद आवारामध्ये दोन दिवसाचे उपोषण करण्यात आले. त्यानंतर 27/ 12/ 2021 पाच दिवसाचे उपोषण जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या तोंडी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
दहिगांव-ने तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बेकायदेशीर झालेले बांधकाम कुठल्याही प्रकारचा ७/१२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर नसतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी कसं काय दिला. गेल्या पन्नास वर्षापासून वि.वि.सेवा सहकारी सोसायटी दहिगांव-ने तालुका शेवगाव यांच्या नावे ७/१२ आहे व होता त्या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी बांधकाम केले कसे व कोणाच्या सांगण्यावरून केले. या भ्रष्टाचारी अधिकारी व पद अधिकारी यांची चौकशी करुन दोषी अधिकारी व पदाधिकाऱी तातडीने यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. याकरिता शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय एस.राजेभोसले, व प्रवीण शंकर खोमणे प्राणांतिक उपोषणाला बसले होते. उपोषणा संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले यांच्या समोर चर्चा होऊन तोंडी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण स्थगित करण्यात आले .पण कुठल्याही प्रकारचे आरोग्य विभागाच्या बांधकामासंदर्भात चौकशी अथवा गुन्हे दाखल झाले नाहीत. जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी सांगितले होते की पाच दिवसात दिवसात कारवाई करू असे तोंडी आश्वासन दिले होते. पण कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे पाचव्यांदा प्राणांतिक उपोषण दिनांक सोमवार 10 जानेवारी 2022 पासून होणार आहे.
मागच्या उपोषणाच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे साहेब यांच्यासमक्ष चर्चा झाली होती.परंतू सदर अधिकारी यांनी त्याचे गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून येते.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खोमणे यांनी सांगितले की लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर दिनांक 10 जानेवारी 2022 पासून जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाच्या आवारात प्राणांतिक उपोषणाला बसणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय एस. राजेभोसले यांनी दिली.

