shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनायक शिरसागर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त....!

देहरे । प्रतिनिधी :-
दिनांक आठ जानेवारी 2022 रोजी अहमदनगर येथे पंचायत समिती नगर  यांच्यामार्फत विविध पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.....त्यामध्ये शिंगवे नाईक , रामवाडी, तालुका नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विनायक क्षीरसागर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला...त्या निमित्ताने शिंगवे नाईक येथे दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी शिरसागर यांचा  शाळेत  जाऊन ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला....!


सरांनी शाळेसाठी तब्बल 11 वर्षे आपली सेवा दिली आहे, सदर कालावधीत शाळा सुरुवातीला मोकळ्या पटांगणामध्ये,तर झाडाखाली तर कधी, पालकांच्या घरात, तर आज रोजी सुसज्ज इमारत मध्ये नेण्यासाठी सरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले आहे..अशी भावना व प्रतिक्रिया नागरिकांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली....सदर शाळेत आदिवासी  समाजाचे विद्यार्थी जास्त प्रमाणात शिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती अतिशय चांगल्या दर्जाची आहे. व कौतुकास्पद देखील आहे.याच कामाची दखल घेऊन शिरसागर सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, व त्यांच्या कामाची पावती पुरस्कारा  मार्फत त्यांना मिळाली आहे. अशी   प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे....!

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तथा कार्यक्रमाप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, माजी सरपंच विश्वासराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कोळपकर, मंगलताई निकम,  शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सोन्याबापू निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत, सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके, विवेक शिंदे,महेश घुले, दत्तात्रय निकम, पालक, शिक्षणप्रेमी, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकता श्री हरीश शेळके यांनी केली, तर आभार महेंद्र कोळपकर यांनी मानले...!
close