shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालीचरण महाराजांचा एकीकडे निषेध होत असताना अहमदनगरमध्ये ‘ह्या’ गावात त्यांच्या समर्थनार्थ रॅली ; गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०५ डिसेंबर २०२२


कालीचरण महाराजांचा एकीकडे निषेध होत असताना अहमदनगरमध्ये ‘ह्या’ गावात त्यांच्या समर्थनार्थ रॅली..!!

पाथर्डी : कालीचरण महाराज हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच प्रसिद्ध असतात. आता नुकतेच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
त्यानंतर त्यांचा विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील झाली.

परंतु त्यांचा एकीकडे निषेध होत असता अहमदनगर मध्ये मात्र त्यांचे समर्थन करणारी रॅली काढण्यात आली. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांच्या समर्थनार्थ ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

कालीचरण महाराजासह छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम, अशा घोषणा रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी दिल्या. रॅलीची सुरुवात मिरी गावातील बाजारतळ येथून करण्यात आली.

हनुमान मंदीर, एसटी बसस्थानकमार्गे बाजारतळावर रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत सोमनाथ झाडे, आकाश धनवटे, किरण शेळके, अनिकेत पटारे, शुभम मोटे, बबन केरकळ, मनोज शिंदे, गौतम गवळी, अजय मरकड, सौरभ घोरपडे, रोहित गवळी,

एकनाथ मिरपगार, नितीन मिरपगार, गणेश खोमणे, राहुल शेळके, विनोद घोरपडे, गोविंद घोरपडे यांच्यासह एक लढा हिंदू धर्मासाठी या संघटनेचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. संबंधित रॅलीप्रकरणी कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती.
 " : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ रॅली काढणाऱ्या तरुणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून दुचाकी रॅली काढून कालीचरण महाराज यांचे समर्थन केले होते.

जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा आजार पसरत असल्याने लोकांनी जमाव जमू नये, असा आदेश काढलेला असताना देखील बेकायदेशीरपणे रॅली काढून आदेशाचे उल्लंघन केले, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही परवानगी नसताना ही रॅली काढण्यात आली होती. पोलिस कॉन्स्टेबल भगवान मधुकर सानप यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे."

मिरी या ठिकाणी निघालेली रॅली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.




✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close