शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
गुहा येथील अनाधिकृत जमीन वापराची चौकशी करा - भाऊसाहेब पगारे..!!
राहुरी : तालुक्यातील गुहा येथील गट नंबर ३३०/१ मधील शिंदे डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने अनाधिकृत जमीन वापराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाच्यावतीने राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी म्हंटले की, गुहा येथील गट नंबर ३३०/१ मध्ये शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपणीने डांबर मिक्सिंगसाठी प्लॅन्ट उभारला असून नगर ते कोपरगाव रस्ता डांबरीकरण आणि खडीकरणासाठी आवश्यक प्रकिया उद्योग गट नंबर ३३०/१ मध्ये चालणार आहे. मात्र त्या गटाचे व्यावसायिक करण्यासाठी वापर होत असेल तर त्या गटाचे अकृषिक क्षेत्रात रूपांतर करणे आवश्यक आहे तसेच गुहा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता आहे. सदर ठिकाणी डांबराच्या मिक्सिंग यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होऊन आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे. गट नंबर ३३०/१ क्षेत्राच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे.
सदर गटाचे व्यावसायिक कारणासाठी वापर करण्यापूर्वी त्या गटाचे अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे काय? नसेल तर शिंदे डेव्हलपर्स कंपनी त्या गटाचा अनाधिकृत वापर कुणाच्या आशिर्वादाने केला आहे का? तसेच वेगवेगळे यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होणार आहे. त्यावर काय उपाययोजना केल्या आहेत याची चौकशी करून विनापरवाना व्यावसायिक कारणासाठी सदर गट नंबरचा वापर केला आहे याबाबत दंडात्मक कारवाई तातडीने करून शासनाचा महसूल बुडत असल्याने कारवाई करावी अन्यथा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, उपतालुकाध्यक्ष रमेश पलघडमल, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, शहराध्यक्ष प्रतिक रूपटक्के आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

