shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकज कुमावत यांची चंदन तस्करविरुद्ध कार्यवाही : केजच्या नवनिर्वाचित नगरसेवकासह तिघांवर चंदन तस्करीचा गुन्हा दाखल..!!


-----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अंबाजोगाई साखर कारखाना परिसरातील शेतातील एका शेडवर धाड टाकून ६७ हजार रु किमतीचे चंदन जप्त करून केज नगर पंचायतच्या नवनिर्वाचित नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे*.                           

केज नगरपंचायतीच्या निवडणूका होऊन व निकाल लागुन काहिच दिवस झाले आहेत. अश्यातच नवनिर्वाचित नगरसेवकावरच चंदन तस्करीचा  गुन्हा दाखल झालेला असल्यामुळें  केज शहरातील जनतेमध्ये या विषयाची चविने चर्चा सुरू आहे.

सिंघम आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैद्य धंद्यावाल्यांना सळोकी पळो केले आहे . दि.२६ जानेवारी बुधवार रोजी रात्री १०:३० वा. पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात देवराव कुंडगिर यांचे शेतात बाळासाहेब दत्तात्रय जाधव हा चंदन तस्करी करीत आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक बीड यांना दिली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक राजू वंजारे, रामहरी भंडारे, सचिन अहंकारे यांना कार्यवाहीचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड घातली. त्यात देवराव कुंडगिर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये चंदनाची झाडे चोरून तोडून आणलेल्या चंदनाची लाकडे तासून चंदनाचा गाभा काढून तो पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. या प्रकरणी तेथे उपस्थित असलेल्या इसमास पोलीसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की,सदरचा माल बाळासाहेब दत्तात्रय जाधव राहणार यांचा असून त्यांची सांगण्या वरून त्यांचा मुनीम सतीश व तो असे दोघेजण माला घेतात. असे सांगितले म्हणून बाळासाहेब दत्तात्रय जाधव, रा केज, त्याचा मुनीम सतीश आणि देवराव कुंडगिर यांल तिघांच्या विरुद्ध सपोनि संतोष मिसळे यांच्या फिर्यादी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान चंदन चोरीच्या प्रकरणातील या तीन आरोपी पैकी बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे केज नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यामुळे या कार्यवाहीची सर्वत्र चवीने चर्चा सुरू आहे.
close