सावित्रीमाई फुले महिला गौरव पुरस्कार तेजीपृथ्वी ग्रुपच्या अनिताताई नानासाहेब खरात यांना प्रदान.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २३ जानेवारी २०२२ इंदापूर सावता माळी मंगल कार्यालय येथे भारतीय अमृत महोत्सवा निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व महामानवांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महिला सबलीकरणाच्या बहुमोल समाजकार्याबद्दल तेजपृथ्वी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्ष व महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ अनिताताई नानासाहेब खरात यांना सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार डॉक्टर इनामदार अकलूज यांच्या हस्ते देण्यात आला .
तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सामाजिक काम होत असून या ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष महिला दक्षता समितीच्या माध्यमातून इंदापूर पोलिस स्टेशन असो व इतर ठिकाणी महिलांचे प्रश्नांसाठी काम करत असतात.
जरी एखाद्या महिलेने रात्री अकरा अकरा वाजता फोन केला तरी अनिताताई इंदापूर पोलीस स्टेशनला हजर राहुन महिलांच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात .
सुप्रसिद्ध डॉक्टर इनामदार म्हणाले की, आपल्या घरातील मुलं बाळ संसार संभाळून महिला सामाजिक काम करतात हे खूप कौतुकास्पद आहे .सध्या इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर अपर्णा जाधव ,भरारी पथकाच्या माधुरी लडकत व महिला दक्षता समिती च्या माध्यमातून अनिताताई खरात व इतर महिला सदस्या अतिशय चांगलं काम करत आहेत गोरगरीब महिलांसाठी किंवा कौटुंबिक कलांमध्ये सर्व ठिकाणी जिथे महिलांवर अन्याय होईल किंवा महिलांचे काही प्रश्न असतील अशा ठिकाणी अनिता ताई खरात धावून जातात.
यावर अनिता ताई खरात यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, मी जे काम करते त्यात माझ्या तेजपृथ्वी ग्रुपचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक मला मोलाची साथ देतात. त्यांच्यामुळेच मी हे काम करू शकते तसेच महिला दक्षता समितीच्या माध्यमातून काम करत असताना दक्षता समितीच्या सर्व सदस्य महिला व इंदापूर पोलिस स्टेशनचा सर्व स्टाफ हा नेहमीच मला सहकार्य करतात आज जो पुरस्कार मिळाला त्याचे हकदार तेजपृथ्वी ग्रुपचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक व इंदापूर पोलिस स्टेशनचा सर्व स्टाफ आहे या पुरस्काराने भविष्यात काम करण्यास मला खूप मोठे बळ मिळेल आपले आशीर्वाद असेच रहावे अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास डॉक्टर इनामदार, भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, भाजप किसान मोर्चा चे माऊली चौरे, नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

