देवळाली प्रवरा । प्रतिनिधी :-
दि. १९ : मनसे तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या आदेशानुसार १ फेब्रुवारी पर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील दुकानावरील हॉटेल ,शाळेवरील, व हॉस्पिटल वरील पाट्या मराठीत कराव्यात या साठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मा मुख्याधिकारी देवळाली प्रवरा यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हंटले आहे की पालिकेने पत्रक काढून सर्व आस्थापनांना मराठी पाट्या अनिवार्य कराव्या अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी निकद साहेब यांना करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे,साहिल पठाण,अनिल गीते, सौरभ निकम,शुभम गीते, सचिन सोनवणे, यश सरोदे ,नरेश गोरे यादी उपस्थित होते.

