इंदापुर मध्ये व्यवसायात यशस्वी भरारी घेत सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारे संदीप दोशी ऊर्फ पिंटू म्हसवडकर.
अभिष्टचिंतन विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरांमध्ये अनेक व्यवसायिक वेगवेगळ्या सेवा पुरवीत ग्राहकांची रसद पुरवित असतात. मानवी जीवनाशी निगडित असणाऱ्या सेवा इंदापुर मध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्व व्यवसायिक मिळवून देण्याचे कार्य आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत असतात व त्यातून आपले आर्थिक सुव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतात.
असेच सागर ट्रेडिंग कंपनीचे किराणा दुकानाच्या व्यवसाय करणारे सुकुमार दोशी त्यांना म्हसवडकर या नावाने ओळखले जाते असेच सुकुमार दोषी म्हसवड या गावावरून इंदापुर मध्ये ३५ वर्षांपूर्वी येऊन या किराणा दुकानाचा व्यवसायाची सुरुवात केली व त्याद्वारे त्यांनी आपल्या व्यवसायात ग्राहकांची सेवा सुरू केली. त्यांचा मुलगा म्हणजे संदीप जोशी उर्फ पिंटू म्हसवडकर यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले असून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित व्यवसाय असलेला तोच व्यवसाय वयाच्या सतराव्या वर्षापासून संदीप ट्रेडिंग कंपनी या नावाने बाबा चौक या ठिकाणी चालू केला त्यांच्या या व्यवसायातील अनुभवाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करत तालुक्यामध्ये अनेक किराणा व्यवसायिक व ग्राहकांना त्यांना लागेल तो वस्तूंचा पुरवठा करून स्नेहसंबंध जपले आज त्यांचे नाव इंदापूर शहरातील व बाहेरील लोकांमध्ये एक विश्वासू व्यवसायिक म्हणून ओळख निर्माण झालेली दिसून येत आहे व्यवसाय क्षेत्र बरोबर त्यांनी सामाजिक क्षेत्रातही कोणालाही नकळत आपल्या परीने शक्य होईल त्या पद्धतीने आधार देण्याचे कार्य ही त्यांनी केलेले आहे अशा युवा व्यावसायिकाचा अभिष्टचिंतन असून त्यानिमित्त त्यांना त्यांच्या इष्ट मित्र व चाहत्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त होत असताना दिसत आहेत.

