shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिटे कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभी - राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिटे कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभी - राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बोरी या गावी आज(१७ जानेवारी) रोजी सकाळी साडेअकरा दरम्यान इंदापूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर व इंदापूर तालुका युवती अध्यक्षा अश्विनीताई  कुरडे यांनी भीटे कुटुंबीयांना भेट देऊन सदर घटनेबद्दल माहिती घेत त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच राज्य महीला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,  खासदार सुप्रियाताई सुळे, इंदापूर तालुक्याचे आमदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष भारतीताई शेवाळे हे या  भीटे कुटुंबियांच्या पाठीशी उभी असून नक्कीच आम्ही याचा छडा लावल्याशिवाय गप्प राहणार नाही. जे तीन टवाळखोर असतील किंवा त्याच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना आम्ही नक्कीच कायद्यानुसार त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे जेणेकरून जे टवाळखोर असतील त्यांच्या डोळ्यावरील झापडे निघाली पाहिजे. आणखीन दुसऱ्या कुठल्या मुलींचा बळी गेला नाही पाहिजे असा आम्ही ठामपणे कुटुंबियांच्या पाठीमागे उभे आहोत. याचा छडा लावल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही असा विश्वास बोरी येथील भीटे कुटुंबीयांच्या घरी छायाताई पडळकर यांनी व्यक्त केले.
गजानन पांडुरंग भिटे, व अंजना गजानन भिटे, राहणार बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची कन्या सिद्धी गजानन भिटे,वय १५, इयत्ता नववी मध्ये शिकत होती, बोरी तील ३ टवाळखोर मुलांनी तिची छेडछाड केल्यामुळे त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली , आम्ही या प्रकरणाला नक्की न्याय मिळवून देण्याचा पर्यंत करत आहोत, आणि आश्या युवतीचा  ,परत आजुन बळी जावू नये, या साठी   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिटे कुटुंबियाच्या ठामपणे उभा आहे अशी चर्चा सदर कुटुंबियांशी  इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर व इंदापूर तालुका युवक अध्यक्ष अश्विनीताई कुरडे यांनी केली.
यावेळी भिटे कुटुंबियातील सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे व प्रमोद सावळकर इत्यादी उपस्थित होते.
close