shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पद्मश्री पवार यांच्या हस्ते सदगुरु सेवा केंद्राचे लोकार्पण..!!

अहमदनगर ,  सोमवार ,दिनांक 24 जानेवारी 2022.पद्मश्री पोपटराव पवार ,श्री सद्गुरू मठाचे प्रमुख लक्ष्मण महाराज , अहमदनगर वकील संघटनेचे अध्यक्ष अनिल सरोदे, आदींच्या  उपस्थितीत मेहेकरी ( ता. जि.नगर  ) येथील श्री सद्गुरू सेवा प्रेरणा केंद्राचे येत्या प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होत आहे. येत्या बुधवारी सकाळी १०.३०  वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.


निवृत्त पोलीस अधिकारी ॲड.अविनाश बुधवंत  , मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर खेडकर सर , ग्रामविकासात लक्षणीय योगदान देणारे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत खाडे , मेहेकरी येथील सरपंच संतोष पालवे , पदाधिकारी शरद बडे, मेहेकरीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पालवे,इतर सर्व ग्रामस्थ,सामाजिक संस्था आणि संघटना यांचे कार्यकर्ते  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी भारताची भावधारा,  हा कार्यक्रम सौ स्वाती रानडे आणि त्यांचे सहकारी येथे सादर करतील.

स्पर्धा परीक्षा आणि सेवा केंद्र.

 मेहेकरी - सोनेवाडी - आगडगाव - रतडगाव - देवगाव- कौडगाव  या अहमदनगरच्या पूर्वेला असणाऱ्या पंचक्रोशीतील सुमारे 2 हजार विद्यार्थी अहमदनगर मध्ये उच्च शिक्षणासाठी येतात. यातील सुमारे १३५०  विद्यार्थी  नगरमधील विविध स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये तसेच अभ्यासिकामध्ये सशुल्क प्रवेश घेतात. या दुष्काळी आणि डोंगरी भागातील गरीब विद्यार्थी  वंचित राहतात.

या पार्श्वभूमीवर  मेहेकरी येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी  श्री सद्गुरू सेवा प्रेरणा केंद्र एक आशाकिरण ठरेल. येथे दर्जेदार  स्पर्धा परीक्षा केंद्राची सुविधा स्नेहालयमुळे उपलब्ध झालेली आहे.  येथील  अभ्यासिका , वाचनालय 24 x 7 नाममात्र शुल्कात उपलब्ध राहील.

 देशातील नामांकित स्पर्धा परीक्षा केंद्रांशी जोडून ऑनलाईन  प्रशिक्षणाची सोय येथे उपलब्ध केली जाणार आहे. पोलीस ,तलाठी , शिक्षक होण्याची जिद्द असणाऱ्या युवकांना मोठे स्वप्न पहायला हे केंद्र मदत करणार आहे.

 

हिरे परिवाराचा सहयोग

मेहेकरी येथील स्व. गोविंद नारायण तथा ॲड.बाळासाहेब हिरे  हे अहमदनगर जिल्ह्यातील मागील पिढीतील नामवंत स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी , रावसाहेब पटवर्धन स्मारक ट्रस्ट , हिंद सेवा मंडळ , जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना यांचे ते पदाधिकारी आणि आधारस्तंभ होते.गरीबांचे वकील ,म्हणून ते प्रख्यात होते.नाट्य चळवळीचे ते प्रणेते होते. स्व.हिरे यांची मुले श्रीकांत , स्व. डॉ.सुहास , ॲड.अशोक ,मुलगी शुभांगी दशपूत्रे  यांच्या परिवाराने आपला मेहेकरी येथील 18 हजार चौरस फुटांचा  चिरेबंदी वाडा स्नेहालय संस्थेला सहयोग म्हणून दिला.

देश आणि समाजाला समर्पित  उपक्रम  वडील ॲड. हिरे आणि मातोश्री ताराबाई  यांच्या  स्मरणार्थ  पंचक्रोशीत युवक ,महिला ,

शेतकरी ,पर्यावरण ,रोजगार यांच्यासाठी राबवले जावेत,अशी हिरे परिवाराची अपेक्षा आहे. जागेसोबतच  बांधकामासाठी देखील  हिरे कुटुंबीयांनी संपूर्ण आर्थिक सहयोग दिला आहे. मेहेकरी  प्रकल्पात १२००  चौरस फुटांचे  ॲड.हिरे स्पर्धा परीक्षा वाचनालय आणि ग्रंथालय , ५००  चौरस फुटांचे मातोश्री काशीबाई नारायण तथा ताईसाहेब  हिरे आतिथी गृह , ४  हजार चौरस फुटांचे श्री सद्गुरू सभागृह, लोकनेते गोपीनाथ मुंडे युवा केंद्र  ,स्व.नानाजी देशमुख ग्राम विकास प्रशिक्षण केंद्र  असे प्रकल्प साकारण्यात आले आहेत. भविष्यात येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या  सामान्य आणि दिव्यांग  विद्यार्थ्यासाठी ९०  क्षमतेचे वसतिगृह बांधले जाणार आहे.

मॉडर्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे इकबाल सय्यद यांनी सामाजिक जाणिवेतून ना नफा ना तोटा, तत्त्वावर या प्रकल्पाचे बांधकाम करून दिले. ज्या गावात आपले वाड - वडील राहिले,त्या   गावासाठी असा निरपेक्ष सहयोग देऊन हिरे परिवाराने एक आदर्श निर्माण केला आहे.

 स्नेहालय परीवारातील सुवालाल शिंगवी,संजय हरकचंद गुगळे,हनीफ शेख , मिलिंद एकनाथ कुलकर्णी ,अनिल गावडे,जया जोगदंड,शारदा गौडा ,राजीव गुजर,जयकुमार मुनोत, अजय वाबळे, प्रवीण मूत्याल , संजय चाबुकस्वार , अशोक अकोलकर,संजय बांदिष्टी  यांनी हिरे परीवार आणि इकबाल सय्यद आदींची कृतज्ञता व्यक्त केली .


close