shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साळेगाव जवळ अपघातात मोटार सायकलस्वार गंभीर जखमी..!

जखमीला एकाने लाथाने मारल्याने लोकात संताप!! 


---------------------------------------------------

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-

साळेगाव येथे एका मोटार सायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.




या बाबतची माहिती अशी की, दि. १८ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी ६:४५ वा. च्या दरम्यान कळंब तालुक्यातील आंदोरा (मस्सा) येथील रामदास तांबारे हे केज येथून शेतात लावण्यासाठी बटाट्याचे बेणे मोटार सायकल क्र. (एमएच-१२/बीझेड- २५३२) वरून जात असताना साळेगाव येथे केज-कळंब महामार्गावर त्यांना एका अज्ञान वाहनाने धडक दिली. यात रामदास तांबारे यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 


दरम्यान जखमी अवस्थेत रस्त्यावर वेदनेने तडफडत पडलेल्या रामदास कदम याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्या ऐवजी एका तरुणाने तशा अस्वस्थेत लाथा मारल्याची माहिती समोर येत आहे. त्या निर्दयी बदमाशावर पोलिसांनी कार्यवाही करायला हवी. अशी मागणी होत आहे.

close