गोखळी ग्रामपंचायत उभारणार माझी वसुंधरा अभियानांतर्गत बायोडायव्हर्सिटी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोकुळ ग्रामपंचायत येथे वेगवेगळ्या माध्यमातून विकास कामे होत असताना त्यामध्ये गोखळी गाव स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने गावामध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गावात बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार असल्याचे माहिती ग्रामपंचायत सरपंच सौ अलकाताई पोळ उपसरपंच सचिन तरंगे व ग्रामसेवक जाधव - गायकवाड मॅडम यांनी सांगितले.
यामध्ये त्यांनी सांगितले की, गोखळी ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलेले असून त्याबरोबर प्लास्टिक बंदी ही या गावांमध्ये करण्यात आलेली आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणी बरोबर विविध उपक्रमही ग्रामपंचायत राबवित आहे त्यासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ही या अभियानामध्ये सामील झाले असून त्यानुसार त्यांनी माझी वसुंधरा अंतर्गत शपथ घेऊन कार्याला सुरुवात केली आहे.

