shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्य शासनाचे निर्बंध असताना जिल्हा बँकेच्या तालुका मिटींगचा सपाटा सूरू..!

 सोनई (वार्ताहर):- राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्ण संख्या वाढत असताना तसेच शासन स्तरावर कडक निर्बंध लागू करीत आहे मात्र जिल्हा प्रत्येक तालुक्यात राज्य शासनाचे नियमांना हरताळ फासुन सुट्टीच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात मिटींगाचा सपाटा लावला आहे. सरकार दररोज कडक निर्बंध लागू करत असताना जिल्हा बँके कडुन नियम धाब्यावर बसवून दर रविवारी मिटींगा घेऊन बँक काय साध्य करीत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

आता यात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने या मिटींगा बंद कराव्यात. राज्य सरकारने पन्नास टक्के लोकांची मर्यादा असताना हे लोक गोळा करुन बँक व बँकेचे अधिकारी यातुन काय साध्य करणार आहेत..? गेल्या वर्षी करोना काळात जिल्हा बँक कर्मचारी व ग्राहकां साठी कुठलेही संरक्षण दिले नव्हते. यामुळे जिल्हा बँकेच्या दहा ते पंधरा कर्मचारी यांचा मृत्यु झाला याला जबाबदार कोण? त्याच प्रमाणे मासिक मिटींग मधुन करोनाचा शिरकाव होऊन बरेचशा शाखा बाधीत झाल्या होत्या तर काही शाखा काही काळा साठी बंद कराव्या लागल्या होत्या.

या वर्षी ही जिल्हा बँक प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील रविवारी तालुक्यातील स्टापची मिटींग बोलाविल्याने तालुक्यातील शाखांची संख्या पाहता दीडशे ते दोनशे कर्मचारी होतात. त्यातील शंभरच्या पुढे कर्मचारी उपस्थित राहुन करोना नियमांचा भंग होणार आहे. त्यामुळे शासनाचे नियम पायदळी तुडवले जातील याचा बँक प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. काही अधिकारी वर्गाच्या अडेल तटू धोरणामुळे कर्मचारी वर्गाला अडचणीत आणित आहेत यांचा संचालक मंडळाने विचार करूनच निर्णय घेण्यात यावा.
close