इंदापूर येथे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
इंदापूर तालुक्यात अनेक मान्यवरांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त केले अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी:दि.२३ जानेवारी रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय इंदापूर येथे शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी दीप प्रज्वलित करून प्रतिमेला अभिवादन केले.
याप्रसंगी हिंदुरुदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे
त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजामध्ये त्यांचे विचार रुजवण्याची कार्य करीत राहू आणि ज्या ठिकाणी अन्याय घडेल त्याठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करू असा विश्वास इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे ,तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,शहर प्रमुख महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार , तालुका संघटक सुदर्शन रणवरे ,माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका पुष्पा घोरपडे ,तालुका संघटिका सुरेखा लोहार, शेहर समन्वयक संजय खंडाळे, माथाडी कामगार संघटनेचे दुर्वा शेवाळे,उपशहर प्रमुख बालाजी पाटील ,बंडू शेवाळे, उपतालुकाप्रमुख धोंडीराम सोनटक्के ,सुदर्शन साखरे, मंदार डोंबाळे, योगेश वाघमोडे, हेमंत भोसले,अविनाश खंडागळे, आकाश सोमवंशी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

