shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदेड सचखंड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची बॅग मिळाली असताना तिकीट तपासणार यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या स्वाधीन केल्यानंतर संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन देण्यात आले.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या अमृतसर ते नांदेड सचखंड एक्सप्रेसने प्रवास करत असताना एका दाम्पत्याची मौल्यवान वस्तू व पर्स रेल्वे प्रवासामध्ये विसरली होती परंतु पूर्ण सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी ती पर्स मौल्यवान वस्तू त्या प्रवाशाला परत केल्याची घटना दिनांक 16 जानेवारी रोजी घडली असून यामुळे त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

अधिक माहिती अशी की अमृतसर येथून नांदेड कडे येणाऱ्या सचखंड एक्सप्रेस ने दिनांक 15 जानेवारी रोजी भुसावळ येथील पती-पत्नी धीरज दोदानी व त्याची पत्नी लिलाबाई दुधानी हे प्रवास करत होते 15 जानेवारीच्या पहाटे सचखंड एक्सप्रेस भोपाल ते भुसावळ दरम्यान आली असताना ते भुसावळ येथे मुळगाव रेल्वे स्टेशनवर उतरले, परंतु त्यांच्या पत्नीच्या नजरचुकीने मोबाईल मौल्यवान दागिने आधार कार्ड काही नगदी रक्कम व दोन मोबाईल असलेली पर्स सचखंड एक्सप्रेस मध्येच विसरून राहिली तोपर्यंत गाडी निघून गेली होती. सदर महिलेला पर्स विसरले असल्याचे उशिरा लक्षात आले. दरम्यान मनमाड औरंगाबाद जालना परभणी मार्गे सचखंड एक्सप्रेस प्रवास करीत असताना साफसफाई करणाऱ्या रेल्वेतील कामगारांना ती पर्स दिसली त्या सफाई कामगारांनी या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पूर्णा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव पिवळ हवालदार संतोष इंगोले कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण यांना दिले. त्यांनी तात्काळ सचखंड एक्सप्रेस कडे धाव घेत रेल्वेतील डब्यांची पाहणी केली असता एका डब्यामध्ये सीटवर ती पर्स  दिसून आली. त्यांनी तात्काळ प्रस्ताव घेऊन त्यामधील मोबाईल कागदपत्रे एक अंगठी याची सर्व व्हिडिओ चित्रीकरण केले व त्या मोबाईल नंबर द्वारे संबंधित दांपत्याची संपर्क साधला तेव्हा त्यांनी रविवार दिनांक दुपारी एक वाजता नांदेड येथील नातेवाईकांना त्या दागिने संदर्भात माहिती देऊन रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकार्‍याकडे पाठविले. अधिकारी यांनी तात्काळ लेखी जवाब देऊन मौल्यवान दागिने दोदानी यांचे नातेवाईक नांदेड येथील मनोहरलाल आहुजा यांच्याकडे सुपूर्त केले. 


त्यामुळे या वेळी सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव पिवळ, संतोष इंगोले, कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण यांचे कौतुक केले जात आहे.
close