shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

शिर्डी :- भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बुथवर आठ जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत सुदृढ बालक बालिका स्पर्धा तसेच दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रत्येक बुथवर नियोजन करण्यात येणार आहे.अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

यासाठी माजी मंत्री आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार श्री.भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार व भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा चे राष्ट्रीय सचिव श्री. वैभव पिचड, भाजपा प्रदेश व माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार श्री.बाळासाहेब मुरकुटे यांचे विशेष सहकार्य असणार आहे. या मध्ये सुदृढ बालक/बालिका स्पर्धा नमो खेल प्रतियोगिता या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात येणार असून यासाठी बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत. दिनांक 25 डिसेंबर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पासून ते 11 फेब्रुवारी पर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिना पर्यंत च्या कालखंडात पक्ष कार्यकर्ते सक्रीय सदस्य पक्षाचे प्राथमिक सदस्य, हितचिंतक त्यांचे कडून पक्ष निधी (समर्पण निधी) गोळा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. 

आज भाजपा एक नवा पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्यांच्या निधीवर चालतो. 30 मार्च पर्यंत नमो खेल प्रतियोगिता आयोजित करण्यात येणार असून या मध्ये क्रिकेट व्हॉलीबॉल, कबड्डी ,बास्केटबॉल ,मॅरॅथॉन यासह अनेक खेळांचा समावेश आहे. त्यासाठी भव्य आयोजन व बक्षिसे ठेवण्यात येणार आहेत याच दरम्यान पेज प्रमुख व पेज समिती गठित करण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष, सचिव व विविध आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक यांच्या जिल्हास्तरीय समित्या बनवल्या आहे. या समित्या या स्पर्धांचे नियोजन करतील या समित्यांना प्रभारी देण्यात येणार असून हे सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे ही गोंदकर म्हणाले.
close