shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवाजी शाळेत कोरोना लसीकरणाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद...!

तिनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतली कोव्हॅकसीन लस
    
मोर्शी । प्रतिनिधी दि.२८
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी तर्फे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी तालुक्यातील सर्वाधिक मोठी शाळा असणाऱ्या स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत १५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत कोव्हॅकसीन लसीचे लसीकरण करून घेतले.या लसीकरण शिबिरात विजय गाढवे,विनय शेलुरे,ऋतुजा पाटील ,जयश्री बेलसरे,डॉ.संगीता जैन इत्यादी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर,परिचारिका व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेतले. या लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
close