shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव केतकी येथे छत्रपती संभाजीराजे महाराज राज्याभिषेक दिन संपन्न.

निमगाव केतकी येथे छत्रपती संभाजीराजे महाराज  राज्याभिषेक  दिन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी आज दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचा नावाचा जयघोष करण्यात आला.
उपसरपंच दीपक भोंग , किशोर पवार ,  श्री गणेश पत्संस्था चेअरमन राजकुमार घाडगे ,नंदु चकोर ,वैभव मोरे ,अतुल आप्पा मिसाळ ,तात्यासाहेब वडापुरे, ,प्रवीण डोंगरे ,दत्तात्रय मिसाळ ,मोहन कांबळे  ,पक्षीमित्र धनंजय राऊत , संजय हेगडे ,संजय राऊत,   बाळासाहेब जाधव तसेच सुमित चिखले ,सोमनाथ कुचेकर  ,विवेक शिंदे ,रोहन जाधव ,मल्लिकार्ज हिंगाणे, जिजाऊ ग्रुपचे अध्यक्ष राहुल जाधव यांच्या  उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
राज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या शौर्याची गाथा त्यांचे आदर्श विचार आणि पराक्रमाची सतत आठवण प्रेरणादायी राहतील. असे मत यावेळी काही ग्रामस्थांनी मांडले.
close