shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावित्रीबाईंच्या विचारांचे आचरण महिलांनी कृतीतून अनुसरावे ! - अनघा खेडकर


संगमनेर (प्रतिनिधी)-३ -  ' क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या मुळे आज आम्ही सुशिक्षीत आणि सुखी झालो आहोत म्हणून याची उतराई म्हणून सर्व समाजातील गरीब  मुलींना दत्तक घेणे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे या सारखी कामे महिलांनी हाती घेणे गरजेचे आहे ' असे उद्गार अनघा खेडकर यांनी संगमनेर साहित्य परिषद आयोजित सावित्रीबाई जयंती निमित्त काढले. अरविंद गाडेकर यांच्या निवासस्थानी परिषदेच्या मर्यादीत सभासदांमध्ये हा कार्यक्रम पार पडला.




 शशांक गंधे म्हणाले  'सावित्रीबाई फुले या  उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. त्यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच. आज  सर्व महिलांना शिक्षण प्रवाहात आणून शिक्षण दिले गेले पाहिजे'  

         

या प्रसंगी दिलीप उदमले, डॉ.ज्ञानेश्वर राक्षे ज्ञानेश्वर राक्षे, विकास खेडकर,अनिल सोमणी ,अरविंद गाडेकर यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर महत्वपूर्ण माहिती सांगितली.
        

याप्रसंगी महेश गोडसे, गिरीश सोमाणी, सुरेश परदेशी, दीपक टाक, शेख इद्रिस आणि सदस्य उप

close