पाथर्डी (प्रतिनिधी) - तालुक्यातील खरवंडी कासार येथील रावसाहेब पवळे यांची खरवंडी कासार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हा सरचिटणीस इब्राहीम बागवान यांच्याहस्ते नवनियुक्त उपसरपंच रावसाहेब पवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.पं.सदस्य युसूफ बागवान, योगेश अंदुरे, मा.ग्रा.स.मच्छिंद्र पवळे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शब्बीर बागवान, सदस्य परवेज पठाण,मानवहित पार्टीचे तालुकाध्यक्ष शहारुख सय्यद, शाकीर पठाण (सर), पप्पू केकान,मयूर कचरे,शिवा म्हस्के, कृष्णा पवार, नितीन गायकवाड, मुदस्सीर बागवान, मुजम्मील बागवान, सुशांत उनवणे,अरुण पवळे,सो ना पवळे,बबन बुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
खरवंडी कासारचे उपसरपंच दिलीप पवळे यांचे कोरोनाने निधन झाल्याने रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात आली यामध्ये त्यांचे बंधू रावसाहेब पवळे हे विनविरोध विजयी झाले असल्याने आज मंगळवार रोजी खरवंडी कासार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यानिवडीबाबत ग्रामपंचायतमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला,त्यांच्या या निवडीने परिसरातील अनेकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

