shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहावी बारावीच्या परीक्षा होणार का?; अजित पवारांचे मोठ वक्तव्य..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १६ डिसेंबर २०२२


दहावी बारावीच्या परीक्षा होणार का?; अजित पवारांचे मोठ वक्तव्य..!!
 
पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 

परीक्षेसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दाहवी आणि बारावीच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात, तसेच त्या ऑनलाईन घेऊन चालणार नाही. त्या ऑफलाईनच व्हायला हव्यात असे माझे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी काय निकाल लागला हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे गेल्या वर्षीची पुनावृत्ती टाळायची असेल तर परीक्षा या ऑफलाईनच घेतल्या जाव्यात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close