shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर येथील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटातील जखमी मुलीचे निधन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२

बेलापूर येथील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटातील जखमी मुलीचे निधन..!!   

सर्वत्र हळहळ देसाई यांचे शेलार कुटुंबीयांना मदतीचे अवाहन ....

श्रीरामपुर : गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता त्यात घरातील चौघेही गंभीर भाजले होते. त्यांना प्रथम कामगार हॉस्पीटल व नंतर लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. यातील शशिकांत शेलार यांची मुलगी नमश्री वयवर्ष ९ हीचे उपचार सुरु असतानाच आज सकाळी निधन झाले. तिच्यावर शेलार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

शेलार कुटुंबीयातील तिघांवर अजुनही लोणी येथील प्रवरा हॉस्पिटमध्ये उपचार सुरु असुन या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. तरी आपण या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे असे अवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले असुन आपण ७०२००४९४८४ या मोबाईल नंबरवर फोन पे किंवा गुगल पे वर मदत पाठवावी असे अवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close