shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १२ डिसेंबर २०२२
   

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन..!!

अहमदनगर : राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन अहमदनगर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांनी केले आहे.

नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी - मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविण्यात येत आहे.
ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे ( प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह ), अशा लाभार्थ्यांनी दि. १२ जानेवारी २०२२ ( सकाळी १०:०० पासून ) ते दि. १६ जानेवारी २०२२ ( रात्री १२:०० वा. पर्यंत ) या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह लाभार्थ्यांनी दि. १६ जानेवारी २०२२ रात्री १२:०० वा. पर्यंत या विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://ah.mahabms.com, अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव : AH - MAHABMS ( google play store ), कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी : दि. १२ जानेवारी २०२२ ( सकाळी १०:०० पासून ) ते दि. १६ जानेवारी २०२२ ( रात्री १२:०० वा. पर्यंत )

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close