shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथील श्री.वर्धमान विद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंचातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त " वक्तृत्व स्पर्धेचे " आयोजन.

वालचंदनगर येथील श्री.वर्धमान विद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंचातर्फे  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त " वक्तृत्व स्पर्धेचे " आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी श्री वर्धमान विद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंचातर्फे (कनिष्ठ महाविद्यालय विभाग)   " राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "  " " वक्तृत्व स्पर्धेचे " आयोजन करण्यात आले होते . यावेळी मतदान व मतदार यांचे लोकशाहीतील महत्व पटवून देऊन , प्रा. पवार एस . आर . यांनी  "निवडणूक साक्षरता मंचाची " ' प्रतिज्ञा 'घेतली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य  हनुमंत कुंभार , उपप्राचार्य  अरुण निकम, पर्यवेक्षक  काशिनाथ हिरवे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून , क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले .
 या वक्तृत्व स्पर्धेत--
 प्रथम क्रमांक- कुमारी गौरी फडतरे
 द्वितीय क्रमांक-- कुमारी क्रांती क्षिरसागर 
तृतीय क्रमांक --कुमारी आरती धारे 
यांनी प्राप्त केले.
 या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन निवडणूक साक्षरता मंचाचे " नोडल ऑफिसर " प्रा. . पवार एस. आर .यांनी केले
close