shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पेनूर तलावातील १० तराफे जाळले,महसूल विभागाची धडक कारवाई..!


पूर्णा । प्रतिनिधी (सय्यद कलीम):-
तालुक्यातील पेनूर लहान परिसरामध्ये २८ जानेवारी शुक्रवारी नायब तहसीलदारांच्या पथकाने अवैध रेती उपसा करणारे गोदावरी पात्रातील दहा तराफे जाळून नष्ट केले.

नायब तहसिलदार नितीशकुमार बोलेलू यांच्या पथकाने ही धडक कारवाई केल्याने अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. मागील काही दिवसापासून पूर्णा तालुक्यातील पेनूर लहान परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून चाळीस फूट पाण्यामधून मोठ्या प्रमाणात बिहारमधील मजुरांच्या साह्याने अवैध रेती उपसा सुरू आहे. दरम्यान २८ जानेवारी शुक्रवारी याची माहिती नायब तहसीलदार नितीशकुमार बोलोलू यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पेनूर लहान परिसरामध्ये सातेफळ सध्याचे तलाठी वैजनाथ आंमदूरे व शासकीय गाडीचा चालक शेलाटे यांना घेऊन गोदावरीच्या पात्रांमध्ये धाव घेतली. 

पेनूर लहान परिसरामध्ये जवळपास दहा ते बारा तराफेच्या साहाय्याने अवैध रेती उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी तात्काळ गोदावरी नदीच्या पात्रामध्ये धाव घेऊन हे तराफे जप्त करून गोदावरी नदी पात्रातील एका बाजूला संपूर्ण तराफे जाळून टाकले. या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्याचे धाबे दणाणले असून पेनूर लहान परिसरामध्ये दुसऱ्यांदा ही मोठी कारवाई केली आहे.
close