shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धामोरी खुर्द ता राहुरी येथील सरकारी ओढ्यातील अतिक्रमण काढण्याची मागणी...!

अतिक्रमण न काढल्यास नाशिक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर 26 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा...!                              

अहमदनगर (प्रतिनिधी):- धामोरी खुर्द ता.राहुरी येथील शिवाजी भागवत हरिश्चंद्र यांच्या अर्जाद्वारे धामोरी खुर्द येथे गट नं.139 मध्ये ओढ्याच्या बांधला 20 आर जमीन असून त्यांच्या बाजूने ओडा आहे व त्या ओड्याच्या पलीकडील बाजूस गट नं.161 आहे यामधील अंतर 55 मीटर आहे परंतु गट नं.161 अतिक्रमण हे माझ्या बांधला पूर्ण ओड्यात अतिक्रमण आल्याने तो ओढा कोंडला आहे.

शिवाजी हरिश्चंद्र

 त्यामुळे त्या ओढ्याला येणारे पाणी माझ्या क्षेत्रातून जात असल्याने माझे क्षेत्र सहा वर्षी पासून पडलेले आहे 11 एप्रिल 2016 रोजी पासून शासनदरबारी पत्रव्यवहार करीत असताना माझ्या कागदपत्राची बाजू सक्षम असतानाही राहुरी तहसील हे विरोधकांशी आर्थिक हातमिळवणी करून जाणीपूर्वक अर्जदार यांच्या विरोधात निकाल देत गेलेले आहे तसेच राहुरी तहसीलदार यांनी 23 जानेवारी 2021 रोजी स्थळ निरीक्षक केल्याचा पंचनामा पाहता स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. मूळ नकाशाप्रमाणे ओढा असून तरी अभिलेख यांचा अहवाल पाहता सदर चा गट नंबर 139 मधुन जात असल्याचे दिसून येते असे सांगितले व त्या ठिकाणी कोणालाही गाळपेर करण्याचा अधिकार नसताना तहसीलदार तेथे गाळपेर असल्याचे दाखवते तरी तहसीलदार व भूमि अभिलेख अधिकारी यांच्यामध्ये कुठल्याही ताळमेळ दिसून येत नाही म्हणून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो असे दिसून येते.

त्यामुळे अर्जदार यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना सक्षम भेटून सर्व कागदपत्रे दाखवले त्यात त्यांनी तहसीलदार राहुरी यांना अतिक्रमण काढण्याचे सुचवले परंतु आजतागायत ते अतिक्रमण निघालेले नाही म्हणून अर्जदारांची हेळसांड होत आहे व अधिकारी हे कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याने नाशिक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर 26 जानेवारीला आत्मदहन करणार असल्याचे शिवाजी भागवत हरिश्चंद्र यांनी निवेदनात म्हटले आहे.
close