शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२
अळकुटीच्या तीन सावित्रीच्या लेकींच्या गगन भरारीला आमदार लंकेकडून पंखात बळ..!!
पारनेर : घरची परिस्थिती बेताचीच असल्याने अळकुटी येथील भंडारी कुटुंबातील मुलींना नागालँड येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या पगारातून विमानाची तिकिटे काढून दिली आहे. त्यामुळे अळकुटीच्या या तीनही सावित्रीच्या लेकींना आमदार निलेश लंके यांनी मदतीचा हात दिला असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सुद्धा यादरम्यान त्यांनी दिले आहे.
अळकुटी येथील भंडारी कुटुंबातील या तीन भगिनी परिस्थिती अतिशय गरीब, अनवाणी पायाने सराव करता करता या मुलींनी अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा गाजवल्या. आता त्यांची नागालँड येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
परिस्थिती गरीब त्यात ट्रेनने प्रवास करायचा म्हटलं तर पाच दिवस नागालँडला पोहोचण्यासाठी लागतात. हे मला कळताच त्यांचा सन्मान करून या होतकरू खेळाडूंना नागालँडला जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढून दिले.
परिस्थितीला भिक न घालता यशाच्या रेषेकडे धावणारे हे खेळाडू आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहण हे मी माझं कर्तव्य समजतो!, असे आमदार लंके म्हणाले. यापुढे माझ्या पारनेर तालुक्यातील कोणताही खेळाडू परिस्थितीमुळे मागे राहणार नाही अशी खात्री आमदार निलेश लंके यांनी यावेळी दिली.
वडील अर्धांगवायुने १५ वर्षांपासून अंथरुणावर , कुटुंबात आई वडील तीन बहीणी एक भाऊ, दीड एकर शेती कशीबशी कुटुंबाची गुजराण सुरु असलेले अळकुटी येथील भंडारी कुटुंब आहे. या कुटुंबातील शितल ,भाग्यश्री व साक्षी या तीन सख्या बहीणी लांब पल्याच्या धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षीसे पटकावतात.
शेतात रोजंदारीवर कामाला जावून आपल्या आजारी वडीलांच्या औषधपाण्याचा तसेच देशभरात स्पर्धांसाठी प्रवासाचा खर्च भागवतात. या तिघी बहिणी शिक्षणा बरोबरच धावण्याचा कठोर सराव , शेतीकाम, घरकाम व वडीलांची सेवा सुश्रृषा करतात. आई मोलमजुरी करत आहे.
नववीत शिकणारा भाऊ बहीणींना सरावाला व स्पर्धांना वेळ मिळावा म्हणून आईला मदत करतो. सगळ्यात मोठी शितल बी. ए. च्या शेवटच्या वर्षात तर भाग्यश्री प्रथम वर्षाला पारनेरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये शिकत आहे. साक्षी अळकुटी येथील साईनाथ विद्यालयात दहावीत शिकत आहे.
या तिघी प्रशिक्षक श्रीराम आवारी, दिनेश भालेराव, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणा पासून सराव करतात. शितलने वारंगळ (तेलंगणा) राष्ट्रीय क्राॅसकंट्री स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावताना गोल्ड मेडल पटकावले, भुवनेश्वर ओरिसा येथील ऑल इंडिया युनिसांगितले.टी फुलमॅरेथाॅन ४२ कि.मी. व मंगलोर कर्नाटक येथे बक्षीसे मिळवून मॅरेथॉन क्रॉसकंट्रीच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या.त्यामुळे एक भाऊ या नात्याने त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार असल्याचेही आमदार निलेश लंके यांनी आवर्जून सांगितले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

