shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खेळाची मैदाने, खेळाडू, प्रशिक्षक पुन्हा भितीच्या छायेत..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खेळाची मैदाने, खेळाडू, प्रशिक्षक पुन्हा भितीच्या छायेत..!!

अहमदनगर : दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जोमाने सुरू झालेली खेळाची मैदाने, खेळाडू, प्रशिक्षक परत एकदा भीतीच्या छायेत आहेत. स्पर्धांच्या तोंडावर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे खेळाडूंसह प्रशिक्षक धास्तावले आहेत. गेल्यावर्षी ऐन हंगामात जगभरावर कोरोनाचे संकट आले. सर्व क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या. तरी कोरोना संकटातही खेळाडू स्वतःला स्पर्धायोग्य ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने अनेक अडचणींवर मात करत केलेली मेहनत वाया जाण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होताना राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनाच सरावाला परवानगी दिली होती, असे असताना पुन्हा हे सर्व थांबण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम मैदानावरील चपळाई आणि एकाग्रतेवर होणार आहे. सराव थांबल्यास शारीरिक क्षमतेवर याचा परिणाम होतो. नियमित सरावामुळे स्पर्धेसाठी मानसिकता अधिक मजबुत बनत असते. याबरोबर सरावादरम्यान चुका सुधारण्याची आणि स्वतःसाठी नवीन शिकण्याची अधिक संधी असते. अशातच सरावात सारखा सारखा खंड पडल्यामुळे खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्‍यता असते. यातच केलेली मेहनत वाया गेली याची नकारात्मकता मनात तयार होते, त्याच्या इतक्‍या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवते. सरावातील खंडामुळे स्पर्धासमयी दृढ निश्‍चय आणि एकाग्रता नष्ट होते. तरी शासनाने सर्व खेळाडूं प्रशिक्षकांचा विचार करावा.
नारायण कराळे सर, एन. आय. एस तायक्वांदो कोच

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close