shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने राहता तालुक्यात जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आले.


शिर्डी । प्रतिनिधी :-
महाभकास आघाडी सरकार मधील गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले, दोन समाज्यात तेढ निर्माण करण्याचे कार्य केले, ओबीसी समाज्याच्या भावना दुखावल्या, त्याविरोधात मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व श्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी.

 याकरिता शिर्डी येथे प्रांतधिकारी श्री गोविंद शिंदे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेबजी गाडेकर यांच्या सुचनेने तालुकाध्यक्ष श्री स्वानंद (भैय्या) रासने यांच्या नेतृत्वाखाली तसेच सरचिटणीस श्री भिमराज मुर्तडक, ओबीसी मोर्चा युवा शहराध्यक्ष श्री वैभव शिंदे, श्री नितीन वाके, श्री कैलास खोंडे, श्री विजय राहाते, सुनील भुजाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित निवेदन देऊन मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
close