प्रतिनिधी (स्नेहा उत्तम मडावी):-
पुणे :- रॉयल शो चे भव्य दिव्य असे सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची शो रविवार दि.20 फेब्रुवारी ला पुणे मध्ये आयोजित करण्यात आला आहे असे रॉयल चे सर्वेसर्वा आयोजक नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मिस्टर.मिस.मिसेस.किड्स असे या शो चे स्वरुप आहे.पुणे मध्ये प्रथमच महाराष्ट्रकरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुप ची असल्याचे सपोर्टिंग पार्टनर नमिता ताई पाटील यांनी सांगितले.पुणे मध्ये प्रथमच मराठमोळा लूक चे सादरीकरण केले जाईल.हा शो पूर्ण पणे मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणार आहे. रॉयल ने पुणे मधील महिला आणि युवतींना एक रॉयल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.या शो मध्ये इंडिया स्टार गौरव पुरस्कार ने विविध व्यक्तींना मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या शो मध्ये 3 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील सर्वाना सहभागी होता येणार आहे.हा शो रविवार दि.20 फेब्रुवारी रोजी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा पुणे मध्ये सायं 04:00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या शो साठी सर्व जिल्ह्या मधील युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे असे श्रद्धा दराडे यांनी आवाहन केले आहे.
ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 या नंबरवर संपर्क साधावा . या शो ची ग्रुमिंग दि.18 & 19 फेब्रुवारी ला सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे घेण्यात येणार आहे.या शो साठी माननीय आमदार निलेशजी लंके साहेब,
पुणेशहराध्यक्ष मा.आमदार जगदिश मुळीक साहेब,
मा.नगरसेविका सौ.रुपालीताई पाटील ठोंबरे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे , अभिनेत्री माधुरी पवार,दिग्गदर्शक डॉ.शशिकांत डोईफोडे सर, जयदिप शिंदे,निशा शिंदे,तनुश्री जाधव, दिग्गदर्शक रामकुमार शेडगे सर, असोसिएट पार्टनर एस डी आर फाऊंडेशन अध्यक्षा सीमा अनिल इंग्रोळे कोल्हापुर/ मलेशिया,नमिता पाटील, मा.सभापती आशिष राजपुत सर, उद्योगपती रामभाऊ जगदाळे, सीमा रजपुत,स्नेहल सरगर,ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे, आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळं उपाध्यक्ष संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले, सरोज गजभिये, रॉयल विजेती प्रतिक्षा अहिरे,आकाश रणदिवे, तेजस नाईकवाडी,रोशनी कदम,कृष्णकांत लिमये,यश शेडगे, युवाक्षी पाटील,आकाश पवार , साईप्रसाद ,सूरज कुमार,रोहित शिंदे ,मयुरेश अभ्यंकर सर,सौभाग्यवती विजेती कोमल नांदे,सौंदर्यवती मोहीनी धोंगडे,आदिती कदम उपस्थित राहणार आहे.

