shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातून मराठा आरक्षणासाठी 21 ग्रामपंचायत चे ठराव पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे कृती समितीकडून आभार..!!


 

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षण व इतर प्रश्नासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी केज तहसील समोर सुरू असलेल्या केज तालुका मराठा आरक्षण कृती समितीकडे केज तालुक्यातील तीन दिवसात 21 ग्रामपंचायतींनी आपला पाठिंबा देणारे ठराव सादर केले आहेत. 

काल शासनाने छत्रपती संभाजी राजे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने केज येथील आंदोलनही स्थगित करण्यात आल्याचे केज तालुका आरक्षण कृती समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी कळविले आहे.
केज तालुका मराठा  आरक्षण कृती समितीने मुंबईच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा कालचा तिसरा दिवस होता.
काल या आंदोलनात केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार, सुरेशराव खंदारे, भगवान केदार ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष धनराज सोनवणे,  निलेश जगताप, सुरेशराव कदम या मान्यवरांनी सहभाग देऊन बळ दिले.
आतापर्यंत समितीकडे रिपाई (आठवले गट), संभाजी ब्रिगेड, केज तालुका ग्रामसेवक संघटना, केज तालुका वकील संघ,  वंचित बहुजन आघाडी, शिवसंग्राम, शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना या राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेशिवाय 21 ग्रामपंचायतींनी आपले या आंदोलनाला पाठिंबा देणारे ठराव दिले आहेत ज्यामध्ये चिंचोली (माळी), साळेगाव,  नांदूर (घाट), धोतरा,  वाघे बाभूळगाव, दैठणा, राजेगाव, सांगवी (सारणी), विडा, वरपगाव, कापरेवाडी, एकुरका, जवळबन, धोतरा, बोरगाव, भोपला या व इतर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

या आंदोलनाला  तीन दिवस ज्या ज्या व्यक्ती, पक्ष, संघटना  यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग नोंदवून सहकार्य केले त्या सर्वांचे कृती समितीने आभार व्यक्त केले आहेत.
close