शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
श्री. सुनिल घाटुळे व श्री. रशीद गावित हे आहेत फेब्रुवारी महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल..!!
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे.
यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदविचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येतो तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्रे येथील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतो जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषि महाविद्यालयांना, कृषि संशोधन केंद्रांना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.
फेब्रुवारी 2022 या महिन्याकरीता आयडॉल म्हणुन धनराट ता. नवापूर, जि. नंदुरबार येथील श्री. रशीद गावित व कृषि उद्योजक म्हणुन कोल्हापूर कृषि महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतलेले अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील श्री. सुनिल घाटुळे यांचा समावेश आहे. श्री. रशीद गावित यांनी छोटे रेझर तयार करुन गादी वाफ्यावर खरीप व उन्हाळी हंगामातील भात, कांदा इ. पिकांचे रेषा ओढून बी पेरण्याचे तंत्र विकसीत करुन परिसरातील शेतकर्यांना ते वापरण्यास प्रवृत्त केले. श्री. रशीद गावित यांनी कृषक मंडळामार्फत शास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे नवापूर देशी तुरीला बौध्दिक संपदा भारत सरकार भौगोलीक उपदर्शन (जी.आय.) म्हणून नोंद मिळविली. कृषि उद्योजक असलेले श्री. सुनिल घाटुळे यांनी अत्याधुनिक व संगणकीकृत नर्सरी, हवामान अद्ययावत नर्सरी, स्वतंत्र हवामान केंद्र, सोलर युनिटचा वापर यासह 45 एकर क्षेत्रात पाणी अडवा पाणी जिरवा ही यंत्रणा कार्यान्वीत करुन हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरुन आपल्या नर्सरी उद्योगात 50 लोकांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

