shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवन जगा - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवन जगा - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.19
        छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने जीवन जगावे, त्यामुळे यशस्वीपणे जीवन जगता येईल, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
    इंदापूर आय कॉलेज समोर आज शनिवारी (दि.19) सकल युवा शिवभक्त इंदापूर तालुक्याच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील आवाहन केले.
        यावेळी हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 392 वी जयंती आहे. शिवजन्मोत्सव निमित्त आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका समाजाचे नव्हते. संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. जगाच्या कोणत्याही भागात गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. दोन वर्ष कोरोनामुळे आपल्याला मोठ्या उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता आली नाही.
   युवकांना माझे आवाहन आहे की आपण आपले जीवन जगताना आपल्या कुटुंबात, समाजात काम करताना, लोकशाही माध्यमातून काम करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घालून दिलेला मार्ग असेल, स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांनी तसेच गणपती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांची 157 वर्षांची राजवट उलथून लावण्याकरिता म्हणून गणेश उत्सव साजरा करण्याचे धोरण स्वीकारले. हे छत्रपती शिवरायांचे खऱ्या अर्थाने जे विचार आहेत ते विचार आपल्याला पुढे न्यायचे असतील तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभावाचे विचार दिले, संघर्षावर मात करण्याची शिकवण दिली. या परिसरामध्ये आपल्याला भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावयाचा आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close