shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी महिला कॉग्रेस इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला*

*राष्ट्रवादी महिला कॉग्रेस इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला*


इंदापूर प्रतिनिधी: .इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस व इंदापूर शहर यांच्या वतीने आज(३ फेब्रुवारी २०२२) रोजी मकर संक्रांत निमित्ताने हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम इंदापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने उपस्थित सर्व महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देऊन. झाडांचे महत्त्व पटवून देताना ऑक्सीजन मिळवण्यासाठी झाडांची गरज असल्याचे यावेळी छायाताई  पडळकर यांनी  सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा छायाताई पडसळकर व शहर अध्यक्षा उमाताई इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .

यावेळी उज्वलाताई चौगुले इंदापूर शहर उपध्यक्षा, स्मिता पवार कार्यध्यक्षा, करिश्मा शहा, सरचिटणीस, मीना ढोले उपध्यक्षा, गानबोटे ताई, पीडीसीसी बँकेचे गौरी हेगडे -शेंडे मॅडम व इतर महिला उपस्थित होत्या.

close