shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिंचपुर मारुतीच्या मूर्तीची व समाधीची तोडफोड : माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात..!!


-------------------------------------------

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 
 केज येथील चिंचपुर मारुती मंदिराची मूर्ती व त्या समोरील समाधीची तोडफोड करणारे दोन माथेफिरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.


या बाबतची माहिती अशी की, केज येथील माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या शेता जवळ असलेल्या पुरातन मारुतीचे मंदिर आहे. त्या मंदीरात हनुमानाची मूर्ती असून मंदिरा समोर कै. जयवंतराव पाटील यांचे चार बाय चार फूट आकाराचे बांधकाम करून समाधीचे बांधकाम केलेले आहे. त्या समाधीवर हनुमानाच्या पादुका बसविलेल्या आहेत. या ठिकाणी दर शनिवारी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी व महाप्रसादासाठी येत असतात.


दरम्यान दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ३:०० वा च्या सुमारास श्रीराम उर्फ बापु प्रकाश डबरे आणि अमोल रामचंद्र कुरूंद दोन्ही रा. केज या दोन माथेफिरूंनी  मारोती मंदीर समोर असलेल्या समाधी स्थळी बसवण्यात आलेली मार्बल फरशी दगडाने फोडली. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. हे देवाचे मंदिर आहे; असे म्हणाले असता सांगूनही त्यांनी ऐकले नाही. त्या माथेफिरुनी मंदीराचे आतील मुर्तीस दगड मारल्यामुळे हनुमान मुर्तीचा उजव्या बाजुचा टवका निघाला आहे. त्या नंतरही गोंधळ करून पुन्हा समाधी स्थळाची तोडफोड करून नुकसान केले आहे.


या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या पाटील यांनी दि. २७ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार ते दोन माथेफिरू श्रीराम उर्फ बापु प्रकाश डबरे आणि अमोल रामचंद्र कुरूंद यांच्या विरुद्ध गु.र.नं. ५८/२०२२ भा.दं.वि. २९५, ४२७, ३४ आणि महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून त्या दोन माथेफिरुंना ताब्यात घेतले.


या प्रकरणी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

------------------------------------------------


गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी माथेफिरुना घेतले ताब्यात ! :- सदर प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण  होऊन नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि सपोउनि महादेव गुजर, उमेश आघाव, धनपाल लोखंडे, अशोक नामदास, अनिल मंदे, मतीन शेख, राजू गुंजाळ यांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

-------------------------------------------------
close