shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स च्या वर्धा जिल्हा अध्यक्षपदी आशिश दुरुतकर यांची निवड..!

औरंगाबाद (सतीश लोखंडे) प्रतिनिधी:- वर्धा येथील संत ज्ञानेश्वर नगर बागुल लेआउट  नालवाडी मसाळा रोड वर्धा येथील रहिवासी आशिष जयवंत राव दुरतकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ चे अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .शंकर पोवार यांच्या विनंतीनुसार त्यांची वर्धा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे.

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स एनजीओ संस्था  असून या संस्थेला स्कॉटलंड मार्फत आय. एस. ओ. मानांकने ने सन्मानित करण्यात आलेले आहे .आशिश दुरुतकर हे पोस्ट ग्रॅज्युएशन असून एम.बी .ए. पर्यंतचे त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे .ते मागील तीन वर्षापासून डेज अकॅडमी चालवितात.

त्याचप्रमाणे त्यांना कविता लिहिणे ,संभाषण करणे,वक्तृत्व कला  यांचा छंद असून सामाजिक कार्याची सुद्धा त्यांना आवड आहे .त्याचप्रमाणे ते सामाजिक कार्य करत असताना अनेकांना मदत सुद्धा करतात .त्यामुळे जीवन आधार फोंडेशन रेस्क्यू फोर्स च्या माध्यमातून लोकांना ते नक्की न्याय देतील यात शंका नाही.
close