शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२
भिर्रर... खासदार अमोल कोल्हे बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार...!!
दिलेला शब्द पाळणारा नेता....
सोशल मीडियावर एकच धुमाकूळ...
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आज सत्यात उतरवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला.
आज पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले. निमगाव दावडी हा खंडोबाच्या मानाचा हा घाट आहे.
आज बैलगाडा मालक या मानाच्या घाटात स्वखुशीने त्यांच्या सर्जा-राजाची जोडी उतरवल्या आहेत. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे त्यांचा शब्द पूर्ण केला आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना 11 फेब्रुवारीला छेडलं होतं.
कोल्हेंची बारी पाहायला बैलगाडा शौकिनांना देखील उत्सुकता लागलेली होती. अखेर ती शौकिनांची इच्छा कोल्हेंनी पूर्ण केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

