शिवसेनेच्या इंदापूर क्षेत्र प्रमुखपदी सचिन चौगुले यांची निवड
इंदापूर ( प्रतिनिधी ) : इंदापूर येथील सामजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक सचिन चौगुले यांची शिवसेनेच्या इंदापूर शहर क्षेत्र प्रमुखपदी निवड करण्यात आली असून, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश पासलकर व जिल्हा समन्वयक विशाल बोन्द्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
इंदपूर शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय येथे शनिवार ( दि. २६ ) रोजी सचिन महादेव चौगुले यांची क्षेत्र प्रमुखपदी तर शाखा प्रमुखपदी ऋषिकेश महादेव जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय काळे, तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, बालाजी पाटील व आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नूतन क्षेत्रप्रमुख सचिन चौगुले म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेने मला दिलेली संधी मी येणाऱ्या काळात सार्थ ठरवून दाखवेन, वरिष्ठांच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करुन, इंदापूर तालुक्यात शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
फोटो ओळ : इंदापूर येथे शिवसेनेच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते सचिन चौगुले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले

