शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२२
शेजारील कुटुंबाने विवाहित महिलेला चारित्र्यावरुन शिवीगाळ केल्यामुळे गळफास घेवुन संपवली जीवन यात्रा..!!
अहमदनगर (शेवगाव) : जिल्ह्यातील शेवगाव येथे एका महिलेनं आपल्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून थेट गळफास घेत जीवन यात्रा संपवण्याची घटना घडलेली आहे. सदर आत्महत्या करणाऱ्या महिलेला तिच्या घरा शेजारी राहणारे कुटुंब तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होते तसेच तिला मानसिक त्रास देखील होते. हा सर्व मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे शेवटी सदर महिलेने टोकाचे पाऊल उचलत थेट आपली जीवन यात्रा संपवून टाकली आहे.
जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी राहणाऱ्या संगीता आशिष परदेशी वय वर्ष 30 असं सदर घटनेतील मृत विवाहित महिलेचे नाव आहे. सदर विवाहित महिलेचे ला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये सदर महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर घटनेतील विवाहित महिला संगीता परदेशी यांचे त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या जमीर उर्फ गोट्या रफिक शेख त्याची पत्नी आसमा जमीर शेख आणि या दोघांची मुलगी शाकीर जमीर शेख यांच्यासोबत मागील काही दिवसापासून शुल्लक कारणावरून वाद होत होते.
तिला घराशेजारील त्या कुटुंबातील ते तिघे मिळून शिवीगाळ करत होते तसेच चारित्र्याचा संशय घेत होते. परंतु हा सर्व प्रकार सहन न झाल्यामुळे सदर महिलेने आत्महत्या केलेली आहे. असं म्हणणं महिलेचा पती आशिष विजय परदेशी यांनी पोलिस ठाण्यामध्ये नोंदविलेल्या फिर्यादी मध्ये मांडले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलिस प्रशासनाकडून सुरू असून परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तालुक्यामध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे. शुल्लक कारणांवरून शेजारी-पाजाऱ्यांशी भांडण नेहमी होत असतात. हे काही नवीन प्रकार नाही परंतु चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे सदर महिलेने टोकाचं पाऊल उचलत स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे ही धक्कादायक बाब आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

