अहमदनगर । प्रतिनिधी :-
सविस्तर माहिती अशी की, वरुड तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील गोरख तेलोरे व त्यांच्या कुटुंबाला गाव गुंडांनी केलेल्या जबर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होऊन, सुद्धा आरोपी मोकाट फिरत आहेत.सदर आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी व तेलोरे कुटुंबांना संरक्षण मिळावे. याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले..
निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना सुद्धा देण्यात आल्या. आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई न केल्यास चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. असा ईशारा देखील देण्यात आलेला आहे...
यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, निलेश आंबेडकर, विनोद कांबळे, विकी कबाडे, संदीप डोळस आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

