शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बँकेमध्ये निवड..!!
लोणी : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय व एचडीएफसी बँकेमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
या मध्ये कु.कोमल कुलट व बुलकुंडे रेश्मा यांची आय.सि.आय.सि.आय बँक मध्ये रिलेशनशीप ऑफिसर म्हणून तसेच विनायक क्षिरसागर व उकिरडे ऋषीकेश यांची आय.सि.आय.सि.आय बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर व गुंड संकेत याची एच.डी.एफ सि बँक मध्ये डेप्युटी मॅनेजर या पदावर निवड झाली. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये कॅम्पस मुलाखत, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, बँक व महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील विविध मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, औद्योगिक कंपनी भेटी तसेच कार्यानुभव उपक्रम आदी उपक्रमाचा समावेश होतो.
सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.सुजय विखे पाटील, संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन केले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

