shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; शिवसेनेचा राडा; पायऱ्यांवर कोसळले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२   

पुण्यात किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; शिवसेनेचा राडा; पायऱ्यांवर कोसळले..!!
पुणे : महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला.

सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून वेळीच गाडीत बसविले त्यामुळे सोमय्या थोडक्यात बचावले. सोमय्या यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना महापालिकेतून हुसकावून लावून देण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनं पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवत गाडी पुढे नेली. यावेळी गाडीलाही गराडा घातला गेला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र त्यापूर्वीच पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याचंही पाहायला मिळालं. ते त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close