shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोलण्याच्या नादात राहुरी ते नगर प्रवासा दरम्यान एस टी मध्ये सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ 

बोलण्याच्या नादात राहुरी ते नगर प्रवासा दरम्यान एस टी मध्ये सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना ; तोफखाना पोलीस ठाण्यांत फिर्याद दाखल..!!


 
अहमदनगर : महिलांनीच नियोजनबद्ध पद्धतीने महिलाच्या जवळील सोन बोलण्याचा नादात लंपास केल्याची धक्कादायक राहुरी ते नगर प्रवासा दरम्यान एस टी मध्ये घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातून सदर महिला ही शिर्डी ते दौंड या एसटी मध्ये बसली त्यांच्याजवळ तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे सोन्याचे दागिने होते ते एसटीमध्ये प्रवासा दरम्यान अज्ञात महिलांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने लंपास केले आहे. या घटने प्रकरणी दीप्ती भास्कर लांडे ( वय 21 वर्षे ) यांनी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिलेली आहे. त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तीन महिलांन विरुद्ध गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे.
        दिप्ती भास्कर लांडे या राहुरी मधून अहमदनगरकडे जाण्यासाठी राहुरीतुन शिर्डी- दौंड या बसमध्ये बसल्या होत्या तेव्हा बसमध्ये त्यांच्या शेजारी असलेल्या बाकावर अज्ञात तीन महिला येऊन बसल्या त्या महिलांनी दीप्ती यांच्याशी बोलणे सुरू केले व त्यांचे लक्ष थोडे विचलित करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारांमध्ये दीप्ती लांडे यांच्या जवळ असणाऱ्या डब्यात सोन्याचे दागिने होते या दागिन्यांची किंमत सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक होती ती दागिने त्या महिलांनी बोलण्याच्या नादात केव्हा गुपचुप काढून घेतली.? हे तेव्हा त्यांना समजले देखील नाही.?

       हा सर्व प्रकार जेव्हा लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली असुन या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. परंतु या आधी दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील गंठण लंपास करण्याच्या घटना तुम्ही ऐकले असतील पण आता थेट महिलांच महिलांचे सोन नियोजन करून लंपास करत आहे. आता महिलांनी जर गर्दीच्या ठिकाणी आपल्या शेजारी अज्ञात महिला आल्या आणि त्यांच्यावर जर संशय निर्माण होत असेल तर महिलांनी महिलांपासून देखील सावध राहायला हव आहे..!

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close