सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत याची उपस्थिती..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज शहरात वकिलवाडी भागात नवयुवक प्रतिष्ठान च्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. या मंडळाच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री यशवंत गोसावी यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, विजय आरकडे, अशोक सोनवणे , सुशिल अंधारे यांची उपस्थिती होती. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजनही करण्यात आले होते.
19 फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिर वकिलवाडी प्रांगणात सुंदर सुशोभीकरण केलेल्या मंचावर शिवरायांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. सायंकाळी साडेसात वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून समारोप करण्यात आला. अल्पोपहार व चहापाण्याची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती.
या शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश (बबलू) साखरे,विजय वनवे, मनोज शिंदे, गणेश लांडगे, संजय काळदाते, योगेश गरुड, विजय आंडील, मनीष मस्के. शशिकांत गायसमुद्रे, बाळासाहेब मुंडे, मेजर रोहिदास खामकर,अमोल चव्हाण यांच्यासह सर्व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे केज तालुक्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

