shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सात्रळ महाविद्यालयात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२     


सात्रळ महाविद्यालयात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण..!! 

 
राहुरी : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफेसर डाॅ. सोमनाथ घोलप म्हणाले, लतादीदी देशाच्या शान होत्या. त्यांच्या जाण्याने एका सुरेल युगाचा अंत झाल्याची खंत आम्हाला वाटते आहे. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मुक झाले आहे. आपण सर्वजण त्यांचा मधुर आवाज ऐकत मोठे झाले आहोत. त्यांचे सूर दशकानुदशके आपल्यात राहतील. लतादीदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले.


सात्रळ महाविद्यालयात सप्तसूरांना विनम्र आदरांजली अर्पण करताना उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. बाबासाहेब सलालकर, डॉ. रामदास बोरसे, डॉ. राम तांबे, प्रा. लतिका पंडुरे, डॉ. अमित वाघमारे, कार्यालयीन अधिक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close