shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा क्रांतीसेनेकडुन सत्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२२

 विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा क्रांतीसेनेकडुन सत्कार..!!

राहुरी : वैद्यकीय क्षेत्रातील डॉ तनवीर देशमुख व राजकीय क्षेत्रातील उभरते युवा नेतृत्व ज्ञानेश्वर भिंगारदे यांचा क्रांतीसेनेकडुन नुकताच सत्कार करण्यात आला.
राहुरी शहरामध्ये हाडांच्या रुग्णांसाठी लाभदायी ठरलेले डॉ. देशमुख यांची आयुष भारत नॅचरोपॅथी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्याचबरोबर डिग्रस ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य माऊली या नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले ज्ञानेश्वर भिंगारदे यांची डिग्रस सोसायटीच्या संचालक पदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. या वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्वाचा क्रांतीसेनेकडुन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 
 विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा क्रांतीसेनेकडुन सत्कार...

याप्रसंगी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, सचिन गावडे आदी उपस्थित होते. 

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close