shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ताडकळस येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा माल जप्त; एका आरोपीवर गुन्हा दाखल..!

पुर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात जाणारा रेशनचा माल जप्त करण्यात आला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने  स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे  रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या टाटा एस गाडीची विचारपूस करून पाहणी केली.

त्यामध्ये गहू व तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची गुप्त वार्ता मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे सहायक पोलीस निरीक्षक बोरकर यांच्यासोबत बारवकर असे ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढणे व केसेस करण्याकामी ताडकळस परिसरात पेट्रोलिंग करत होते.

 ताडकळस रोडवर आरोपी  नारायण गणपतराव सरोदे (वय ४७, रा. सैनिक नगर, ताडकळस) हा शासकीय वाटप प्रणाली मधील तांदूळ व गहू चोरट्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल हा वाहन  (क्रमांक चक ०४ एत १५४५) मध्ये भरून विक्रीस जात होता अशी माहिती मिळाल्यानंतर  वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये पांढर्‍या व पिवळ्या प्लास्टिकच्या अंदाजे ५० किलो वजनाचे १४ कट्टे ८ क्विंटल प्रति १६०० रुपयाप्रमाणे असलेला तांदूळ १२ हजार ८०० रुपयांचे तसेच पांढरे व पिवळ्या रंगाचे गहू धान्याने भरलेले बारदाण्याचे अंदाजे ६० किलो वजनाचे ६ कट्टे  अंदाजे ४ क्विंटल गहू प्रति क्विंटल १८०० रुपयाप्रमाणे ७२०० रुपये असा गाडीसहीत एकुण मुद्देमाल १ लाख ३० हजार रुपयांचा माल पोलिसांनी पकडून ताडकळस पोलीस ठाण्यात मालासह वाहन जप्त केले. 

याबाबत आकाश अंकुशराव शिंदे  (पोलीस मुख्यालय, परभणी) यांच्या फिर्यादीवरून कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ प्रमाणे ताडकळस पोलीस ठाण्यात दि.४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलिस ठाण्याचे विजय राठोड तपास करीत आहे.
close