shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजमेर एक्सप्रेसमध्ये दोन वर्षाच्या बाळाचे झाले निधन...!


पुर्णा (प्रतिनिधी ):- जन्मल्या पासुन सतत आजारी असलेल्या  दोन वर्षाच्या बाळाचा हैदर बेग या बाळाचा रेल्वेने  प्रवास करताना अर्ध्या वाटेतच प्राणज्योत मालवली असल्याची घटना दि.12फेब्रुवारी रोजी आकोला  ते वाशिम दरम्यान  घडली आहे. 

मुळचे नामपल्ली हैद्राबाद येथील रहिवासी असलेले मो. हमोद्दीन बेग पिता मिर्झा मो.वलिओद्दीन हे आपल्या  परिवारा सोबत अजमेरला दर्शनासाठी  गेले  होते .ते परत हैद्राबाद कडे निघाले असता गेल्या  दोन वर्षा पासुन श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या  मुत्याजाहैदर बेग या बालकाची प्राणज्योत मालवली चालत्या रेल्वेत बाळाचे निधन झाल्याने आई वडिल कासावीस झाले, त्यानी आपल्या  मुत बालकाला हैद्राबादला घेऊन जाण्यासाठी  रेल्वे  प्रशासनाकडे विनंती केली.
close