शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२
सुदूर संवेदन आणि भौगोलीक माहिती प्रणालीचा वापर नैसर्गीक संसाधन व्यवस्थापनासाठी वापर करणे काळाची गरज- डॉ. इंद्रनील घोष..!!
राहुरी विद्यापीठ : सुदूर संवेदन आणि भौगोलीक माहिती प्रणालीचा उपयोग पर्जन्य जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि पीक पध्दतीच्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी महत्वाचा ठरतो तसेच लॅन्डस्केप आधारीत नियोजन अतिशय अचूक आणि कमी वेळेत पूर्ण करता येते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमासाठी तसेच सर्व आंतरराष्ट्रीय संस्था सुदूर संवेदन, भौगोलीक माहिती आणि जी.आय.एस. प्रणाली हे निरिक्षण आणि नियोजनासाठी अत्यंत कार्यक्षम साधन आहे म्हणून सुदूर संवेदन आणि भौगोलीक माहिती प्रणालीचा वापर नैसर्गीक संसाधन व्यवस्थापनासाठी वापर करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील जी.आय.झेड. (प्रोसॉईल) चे मृदा संरक्षक व वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनील घोष यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतीक बँक अर्थसहाय्यीत भारतीय कृषि अनुसंधान परिषद राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्प कार्यरत असून कास्ट प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व प्रोसॉईल प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गीक संसाधन व्यवस्थापनासाठी सुदूर संवेदन व भौगोलीक माहिती प्रणालीचा वापर या विषयावरील तीन आठवड्याचा राष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजीत केला होता. या अभ्यासक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. इंद्रनील घोष बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजक डॉ. सुनिल कदम तसेच सहआयोजक डॉ. भाऊ गावीत उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट प्रकल्पाद्वारे आतापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा सादर केला. डॉ. सुनिल कदम यांनी तीन आठवड्याच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा आढावा सादर केला. यावेळी डॉ. अरुंधती व निलेश भावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव मालुंजकर व इंजि. कल्पेश बोरसे यांनी केले तर आभार डॉ. भाऊ गावीत यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन डॉ. चैतन्य पांडे, डॉ. अक्षय कुमार आणि इंजि. मोहसीन तांबोळी यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तसेच विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

